‘जनलोकपाल’ असते तर चिंदबरम जेलमध्ये असते – अण्णा हजारे

September 23, 2011 6:00 PM0 commentsViews: 3

23 सप्टेंबर

जनलोकपाल कायदा अस्तित्वात असता तर पी. चिंदबरम यांना आज जेलमध्ये जावं लागलं असतं असं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांचे नाव गेल्या दोन दिवसांपासून त्यांचं चर्चेत आहे आणि त्यातच आता अण्णांनी केलेल्या टीकेची भर पडली आहे.दरम्यान, सूत्रांनी आयबीएन नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार पी. चिदंबरम यांनी पंतप्रधानांना फोन करून राजीनामा द्यायची तयारी दर्शवली होती. यानंतर पंतप्रधानांनी आपण संपूर्णपणे गृहमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून चिदंबरम यांच्यावर आपला विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी म्हटलंय. यासोबतच सरकारमधल्या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

close