लवासाबाबत 3 आठवड्यात निर्णय घ्या : हायकोर्ट

September 23, 2011 6:05 PM0 commentsViews: 6

23 सप्टेंबर

तीन आठवड्यात लवासाबाबत निर्णय द्या असा आदेश मुंबई हायकोर्टाने पर्यावरण आणि वन मंत्रालयाला दिले आहेत. ही शेवटची मुदतवाढ असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं. यानंतर कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. 18 ऑक्टोबरपर्यंत पर्यावरण मंत्रालयाने आदेश काढावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी 18 ऑक्टोंबरला आहे. लवासाचे बांधकाम नियमित करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने 34 अटी घातल्या आहेत. पण त्यापूर्ण करण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने केंद्राच्या पर्यावरण समितीने घातलेल्या काही अटी घातल्या होत्या. त्या अटी पूर्ण केल्याचा दावा लवासाने केला.

close