‘टायगर’ पतौडींना अखेरचा निरोप

September 23, 2011 3:08 PM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर

क्रिकेटमधील टायगर म्हणून ओळखले जाणारे नबाब मन्सुर अली खान पतौडी यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी पतौडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. काल फुप्फुसाच्या आजाराने दिल्लीत त्यांचं निधन झालं होतं. त्यापूर्वी पतौडी यांच्या दिल्लीतल्या घरी सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, भाजप नेते अरूण जेटली, काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्यासोबतच कपिल देव, अजय जडेजा तसेच आयपीएलचे नविन अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पतौडींचं अंत्यदर्शन घेतलं. तसेच क्रिकेटर कपिल देव, अजय जडेजा यांनीही पतौडींचं अंत्यदर्शन घेतलं.

close