ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंत साठे यांचे निधन

September 23, 2011 4:57 PM0 commentsViews: 17

23 सप्टेंबर

ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंत साठे यांचं गुडगावमध्ये निधन झालं आहे. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. त्याच्यामागे दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. काँग्रेसचे एक जुने जाणते अनुभवी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. विदर्भवादी नेते अशीही त्यांची ओळख होती. ते इंदिरा गांधींचे अतिशय विश्वासू सहकारी होते. मेमरीज ऑफ अ रॅशनलिस्ट हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. वसंत साठेंनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचं देहदान करण्यात येणार आहे असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

वसंत साठे यांची कारर्कीद

- 5 मार्च 1925 – नाशिकमध्ये जन्म 1948 – सोशलिस्ट पार्टीत प्रवेश1972 – अकोल्यामधून पहिल्यांदा खासदार1980 – केंद्रीय मंत्री म्हणून निवड- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री – भारतात रंगीत टीव्ही आणण्यामध्ये महत्त्वाचं योगदान1986 – ऊर्जामंत्री 1988-1989. दळणवळण मंत्री

close