विठ्ठलाची महापूजा पुन्हा होणार सुरू

September 23, 2011 5:08 PM0 commentsViews: 2

23 सप्टेंबर

पंढपूरच्या विठ्ठलाची महापूजा पुन्हा सुरू करण्याचा वादग्रस्त निर्णय मंदिर समितीने घेतला. मुर्तीची झिज होत असल्याने 8 महिन्यांपूर्वी महापूजा बंद करण्यात आली होती. त्यामुळे बडव्यांचं आर्थिक गणित बिघडलंय. त्यामुळेच पुरातत्व खात्याची शिफारस धुडकावून पुन्हा महापूजा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याने महापूजा करू नये अशी शिफारस केली होती. मात्र त्या शिफारसीला धाब्यावर बसवत एका खासगी अभ्यासकाच्या रिपोर्टवर मंदिर समितीने हा निर्णय घेतला. 20 ऑक्टोबर नंतर ही महापूजा सुरू होणार आहे.

close