13 जुलैच्या बॉम्बस्फोटाचा कट उलगडण्यात यश !

September 23, 2011 5:14 PM0 commentsViews: 5

23 सप्टेंबर

13 जुलैला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी हल्ल्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे असा दावा पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी केलाय. पण काही धागेदोरे अजूनही मिळत नाही. त्यामुळे माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. 13 जुलैला मुंबईत दादर, झवेरी बझार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी साखळी स्फोट झाले होता. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास 80 लोकं जखमी झाली होती. याबाबत सर्व यंत्रणा तपास करात आहेत. अजूनही घटनेचा उलघडा झालेला नाही. या बाँम्बस्पोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा एटीएसला संशय आहे.

close