मल्याळम सिनेमा ‘आदामिन्टे मगन अबू’ची ऑस्करवारी

September 23, 2011 5:37 PM0 commentsViews: 5

23 सप्टेंबर

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम सिनेमा 'आदामिन्टे मगन अबू' आता ऑस्करला पोचला. भारताकडून या मल्याळम सिनेमाची एंट्री ऑस्करसाठी झाली. सलीम अहमद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन, निर्मिती केली. तर सलीम कुमार यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. अत्तर विकणार्‍या माणसाची कथा सिनेमात आहे. सिनेमात सलीम यांच्याबरोबर झरीना वहाब यांचीही भूमिका आहे. हज यात्रेला जाण्याची या व्यक्तीची इच्छा असते, मात्र ती काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाही अशी या चित्रपटाची मूळ कथा आहे.

close