मनसेची पुन्हा उत्तरभारतीयांना मारहाण

November 17, 2008 5:12 AM0 commentsViews: 1

17 नोव्हेंबर, मुंबईमुंबईतल्या मालाड इथल्या कुरार भागात काल रात्री मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उत्तरभारतींयांना मारहाण केली. मनसेने कोकण महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवात गेलेल्या काही उत्तरभारतीयांना ही मारहाण करण्यात आली. गैरवर्तणूक केल्याचा आरोप करून मनसे कार्यकर्त्यांनी बेल्टने त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणाची कुरार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

close