भाईंदरमध्ये बिल्डिंगचा स्लॅब कोसळला ; 6 जणांचा मृत्यू

September 23, 2011 6:04 PM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर

मुंबईत भाईंदरमध्ये लता अपार्टमेंट या इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. सध्यंाकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी अचानक लता अपार्टमेंट या तिन मजली इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. आणि मग तो दुसर्‍या मजल्यावर पडला आणि मग पहिल्या मजल्यावर कोसळला. ही बिल्डिंग तीस वर्षा पूर्वीची होती. या या अगोदर महापालिकेकडून इमारत खाली करण्यासाठी लोकांना नोटीस दिली होती. असा दावा महापौर तुळशीदास म्हात्रे यांनी केला आहे.

close