तेलंगण समर्थकांचा हैदराबाद बंद ; रेल्वे वाहतूक ठप्प

September 24, 2011 3:50 PM0 commentsViews: 3

24 सप्टेंबर

स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी 12 व्या दिवशीही आंदोलन कायम ठेवलं आहे. तर 48 तासांचे रेल रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यामुळे 28 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर 59 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. दिल्लीहून दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्याही रद्द करण्यात येतील किंवा उशीराने धावतील. हैदराबादमध्येही स्थानिक रेल्वे सेवा म्हणजेच एमएमटीएस (MMTS) गेले 2 दिवस ठप्प आहे. तर रिक्षा चालकांच्या युनियननेही 48 तासांचा बंद पुकारला आहे. शहरात सध्या फक्त 250 खासगी बसेसच्या मदतीने वाहतूक कऱण्यात येतेय. तेलंगणातील पेट्रोल पंप आणि दारुची दुकानंही आज बंद राहणार आहेत.

दरम्यान तेंलगणा बंदचा फटका महाराष्ट्रातून आध्रप्रदेशकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या आणि बसेस वाहतूकीलाही बसला. महाराष्ट्रातून आंध्राकडे जाणार्‍या 3 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर 8 रेल्वे गाड्या केवळ आंध्रच्या सिमेपर्यंत धावणार आहे. नांदेड आगारातून जाणार्‍या 20 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.

close