सरकारमधील लोकच चिदंबरम यांच्या पाठीशी – अण्णा हजारे

September 24, 2011 10:03 AM0 commentsViews: 10

24 सप्टेंबर

2जी स्पेक्ट्रम प्रकरणी पी. चिदंबरम यांना सरकारमधील काही लोक पाठीशी घालताहेत हे बरोबर नाही अशी प्रतिक्रिया आण्णा हजारे यांनी दिली. सरकारच्या अशा वागण्यामुळे चूकीचा संदेश जातोय असंही अण्णा म्हणाले आहे. ते राळेगणसिद्धीत बोलत होते. चिंदबरम यांच्याबद्दलचा आमचा अनूभव सुद्धा काही चांगला नाही असं सांगत बाबा रामदेव यांचं आंदोलन कुणी उधळलं ? असा सवालही अण्णांनी केला.

close