टी-20 स्पर्धेसाठी चेन्नई – मुंबई इंडियन्स आमने सामने

September 24, 2011 12:47 PM0 commentsViews: 28

24 सप्टेंबर

आयपीएलचं विजेतेपद पटकावल्यानंतर चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज सज्ज झाली आहे. मुंबई इंडियन्सविरूद्ध आज चेन्नईचा मुकाबला होणार आहे. चेन्नईची टीम सगळ्याच बाबतीत भक्कम आहे. तर मुंबई इंडियन्सवर खेळाडूंच्या दुखापतीमुळे जास्त दडपण असणार आहे. सचिन तेंडुलकर टाचेला झालेल्या दुखापतीमुळे खेळत नाही. त्याशिवाय रोहीत शर्मा, मुनाफ पटेल, अली मुर्तझा, धवल कुलकर्णी आणि सूर्यकुमार यादवही दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स टीमला मॅचमध्ये पाच परदेशी खेळाडू खेळवायला परवानगी देण्यात आली. मुख्य खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे टीमसाठी ही अट शिथील करण्यात आली. सचिनच्या अनुपस्थितीत टीमचा कॅप्टन पदाची धुरा हरभजन सिंगकडे देण्यात आली आहे.

close