मावळ गोळीबार प्रकरणी पोलीस महासंचालकांनी केला पोलिसांचा बचाव

September 24, 2011 4:09 PM0 commentsViews: 8

24 सप्टेंबर

मावळ गोळीबार प्रकरणी फायरींग बंदुकीने नाही तर रिव्हॉल्वरनं करण्यात आली. ज्या लोकांवर गोळ्या झाडण्याची दृश्यं दाखवली गेली ते लोक रिव्हॉल्वर रेंजच्या बाहेर होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांना घेरल्यानंतरच पोलिसांकडून प्रतिउत्तर देण्यात आले असा दावा पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी केला.

पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात मावळ येथील शेतकर्‍यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या आंदोलनात पोलिसांना आंदोलकांनी घेरल्यानंतरच पोलिसांनी फायरींग सुरू केलं. आधी हिंसाचारात पोलीस जखमी झाले होते. फायरींग दरम्यान कुणालाही गोळी लागली नाही असा दावाही महासंचालक पारसनीक यांनी केला. पोलिसांवर कारवाई फायरींगमुळे नाही तर केवळ त्यांच्या वर्तणुकीमुळे करण्यात आली. या प्रकरणी चौकशी सुरू आहे लवकरच सत्य बाहेर येईल. पोलिसांची बाजूही लक्षात घेणं गरजेचं असल्याचं ही पारसनीस यांनी म्हटलं आहे. मीडियाच्या दाखवण्यावर पोलीसांची प्रतिमा अवलंबून पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामांना प्रसिद्धी मिळत नाही. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी माध्यमांची मदत आवश्यक आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

close