मारूती नवलेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा

September 24, 2011 1:23 PM0 commentsViews: 1

24 सप्टेंबर

पवन गांधी ट्रस्ट फसवणूक प्रकरणी मारूती नवलेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. नवलेंना पुढच्या सुनावणी पर्यंत अटक करू नये असा निर्णय कोर्टाने दिला. 30 सप्टेंबरला पुढची सुनावणी कोर्टात होणार आहे. पुणे- पौड रस्त्यावरच्या अंबडवेट इथल्या पवन गांधी ट्रस्टची साडेअकरा एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न मारूती नवलेंच्या चांगलाच अंगलट आला. कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारताना नवलेंनी कागदपत्रात खाडाखोड केल्याचे म्हटलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जाण्याकरता नवलेंच्या वकिलांनी मागितलेली मुदतही कोर्टाने नाकारली. कोर्टात गैरहजर असलेले नवले गायब झालेत आणि आता पोलीस त्यांच्या मागावर आहेत. मात्र पुन्हा एकदा पोलिसी कारवाईला नवलेंनी हुलकावणी दिली.

close