लंडनमध्ये मिफ्टा सोहळ्याची धूम

September 24, 2011 2:40 PM0 commentsViews: 3

24 सप्टेंबर

दुसर्‍या मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर ऍवार्डस अर्थात मिफ्टाचा सोहळा यंदा लंडनमध्ये रंगतोय. लंडनमध्ये मिफ्टा ऍवार्ड्सची धूम सुरू झाली आहे. त्यासाठी सगळे मराठी कलाकार आणि सेलिब्रिटीज लंडनमध्ये दाखल झाले आहेत. याआधीच्या मिफ्टाने दुबई गाजवली होती. यावेळी लंडनमध्ये मिफ्टाची धमाल रंगणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला वेळ असल्याने सध्या सगळे कलाकार तिथल्या टुरिस्ट स्पॉट्सची मजा लुटत आहे. लंडन मधल्या मराठी नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

close