संयुक्त परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे – पंतप्रधान

September 24, 2011 4:08 PM0 commentsViews:

24 सप्टेंबर

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे अशी मागणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. बदलेल्या स्थितीचा विचार करता सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्यात यावा असं पंतप्रधान म्हणाले. संयुक्त राष्ट्रात पॅलेस्टाईनच्या सदस्यत्वाला त्यांनी पाठिंबा दिला. अमेरिकेला याचा विरोध आहे. तांबडा समुद्र आणि सोमालियन किनार्‍यावरच्या समुद्रचाच्यांच्या धोक्याचाही सामना करण्याचा आवाहन त्यांनी केलं. पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता दहशतवादी कारवायात त्याचा सहभाग असल्याचं सांगितलं. जागतिक अर्थकारण चिंताजनक झाल्याचं पंतप्रधान म्हणाले.

close