नेपाळमध्ये विमान अपघातात 19 ठार

September 25, 2011 9:50 AM0 commentsViews: 1

25 सप्टेंबर

नेपाळमध्ये भीषण विमान अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 10 भारतीयांचा समावेश आहे. बुद्धा एअरलाईन्सचे हे विमान काठमांडूहून विमान पर्यटकांना माऊंट एवरेस्ट दाखवण्यासाठी घेऊन जात होतं. माऊंट एव्हरेस्टजवळच या विमानाला अपघात झाला. 19 जणांमध्ये 10 भारतीय आणि 2 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. या दहा जणांपैकी सात जण तामिळनाडूतील रहिवासी आहेत. पंकज मेहता, छाया मेहता, नागराज एचडी.एस नागराज, एल नागराज अशी या लोकांची नावं आहेत. दरम्यान सर्व मृतदेह दोन हेलिकॉप्टरच्या मदतीनं काठमांडू आणण्यात येत आहेत. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आता या अपघाताच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

close