हैदराबाद बंदचा राज्याला लोडशेडिंग फटका

September 25, 2011 9:58 AM0 commentsViews: 1

25 सप्टेंबर

स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा फटका आता महाराष्ट्राला बसला. तेलंगण बंदमुळे आंध्रातून येणारा कोळसा बंद झाल्यामुळे राज्यातील लोडशेडिंग वाढलं आहे. तेलंगणातील आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे राज्याच्या महानिर्मीती आणि केंद्राच्या थर्मल पॉवर स्टेशन्सना कोळशाचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे कालपासून दोन हजार मेगा टन वीजनिर्मित कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात साते ते 11 तास तर इतर भागात अडीचे ते साडे पाच तास लोडशेडिंग वाढलंय. पण यावर मार्ग करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या योजनेतून 900 मेगावॅट वीज घेतली आहे. तर गुजरातच्या कावस प्रकल्पातून 300 मेगावॅट वीज घेण्यात आली आहे.

close