राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही सामाजिक समतेचा कार्यक्रम

September 25, 2011 10:08 AM0 commentsViews: 2

25 सप्टेंबर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण्का लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांची दुर्बल घटकांच्या मतांसाठी चढाओढ सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 कलमी सनदेपाठोपाठ काँग्रेसही आज 105 कलमी सामाजिक समतेचा कार्यक्रम घोषित केला. देवदासींच्या पुनर्वसनाला प्राधान्य देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर देवदासींच्या पुनर्वसनाचे काम करणार्‍या संस्थेला दरवर्षी राज्य शासनाचा 1 लाखाचा पुरस्कार लताताई सकट यांच्या नावाने दिला जाणार आहे.

दोन संस्थांना प्रत्येकी 50हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहे. तर देवदासींना देण्यात येणार्‍या 600 रुपयांच्या मासीक भत्यात आणखी 600 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. देवदासी आणि त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी देणार्‍या अनुदानात वाढ करण्यात येणार आहे. देवदासी आणि त्यांच्या मुलींना विवाहासाठी प्रत्येकी 25 हजाराचे अनुदान मिळणार आहे.

तर देवदासींच्या पदवीधर मुलींना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या खेरीज देवदासींच्या मुलांना शिक्षणासाठी 1600 रुपये अनुदान दिलं आणि मुलींना 1750 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आणखी एक घोषणा केली ती म्हणजे अपंगांना न्याय देण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत अपंगांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा आहे

close