शोएबनं सचिनची माफी मागेपर्यंत कार्यक्रम होऊ देणार नाही !

September 25, 2011 4:45 PM0 commentsViews: 3

25 सप्टेंबरशोएब अख्तरनं सचिनची माफी मागावी, तोपर्यंत शोएबला मुंबईत कोणताच कार्यक्रम करू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. पुस्तक प्रकाशनाचा घाट घातल्यास कार्यक्रम उधळून टाकू असा इशाराही आव्हाड यांनी दिला. तर शिवसेनेनं शोएब अख्तरच्या पुस्तक प्रकाशनास न जाण्याचा सल्ला दिलीप वेंगसरकर यांना दिला.

शोएब अख्तर यांने आपल्या 'कॉन्ट्रोव्हर्शली युवर्स' या आत्मचरित्रात सचिन आपल्या बॉलिंगला घाबरत होता असं शोएबने म्हटलंय. आपण करिअरमध्ये टॉपला होतो तेव्हा सचिनही आपल्याला बिचकून खेळत होता असा शोएबचा दावा आहे. आपण मैदानात अनेकवेळा चेंडू कुरतडल्याची कबुलीही त्यानं दिली. तसेच सचिन आणि द्रविड यांच्या खेळाडूंसाठी मी भिन्न मत व्यक्त करतो. माझ्या दृष्टीकोनातून ते कधीच मॅच विनर खेळाडू नव्हते.

तर भरात भर ललित मोदी आणि शाहरुख खान यांना आपण आयपीएलमध्ये नको होतो. त्यांच्यामुळेच आपलं आयपीएल करिअर संपुष्टात आलं असंही त्याने चरित्रात म्हटलंय. कालच पाकिस्तनचे माजी क्रिकेटर वसिम अक्रमने शोएबचा समाचार घेत हा खुलासा आपलं आत्मचरित्र विकण्यासाठी खटाटोप आहे असा टोला लगावला. जो सचिन 16 व्या वर्षी घाबरला नव्हता तर आता कसा घाबरेल अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमने दिली.

आता या वादात राजकारण्यांनी उडी घेतली. शोएब अख्तरनं सचिनची माफी मागावी, तोपर्यंत शोएबला मुंबईत कोणताच कार्यक्रम करू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. दरम्यान आता शोएब अख्तरच्या पुस्तकाच्या वादात शिवसेनाही उतरली आहे. शोएब अख्तरच्या पुस्तक प्रकाशनास न जाण्याचा सल्ला शिवसेनेनं दिलीप वेंगसरकर यांना दिला. पण शोएबच्या पुस्तकात सचिनबाबत काही आक्षेपार्ह आढळल्यास पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला जाणार नाही असं आश्वासन वेंगसरकारांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

close