आश्रमशाळेतील 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

September 25, 2011 12:39 PM0 commentsViews: 19

25 सप्टेंबर

नाशिकमध्ये शासकीय आश्रमशाळेतल्या सहाव्या वर्गात शिकणार्‍या 13 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली. पेठ तालुक्यातल्या इमामबारी आश्रमशाळेतली ही घटना आहे. शाळेच्या मागे बेशुद्धावस्थेत ही विद्याथीर्ंनी गावकर्‍यांना आढळली. ही विद्याथीर्ंनी तीन दिवसापासून बेपत्ता होती. मात्र शाळेनं तिचा शोध घेतला नसल्याची पालकांची तक्रार आहे. या प्रकरणी संशयित म्हणून एका 25 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आलंआहे. तर बलात्काराची दुसरी घटना पिंपळगाव गरुडेश्वरमध्ये घडली. तीन वर्षांच्या मुलीवर सख्ख्या काकाने बलात्कार केला.

नाशिकमध्ये गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे आश्रमशाळेची अवस्था मोडकळीस आली आहे. शाळेच्या सुरक्षा भींत, आश्रमशाळेत स्वच्छता गृहाची मोडतोड झाली आहे. यामुळे मागिल महिन्यात याचा फायदा घेत गुंडांनी शाळेत येऊन मुंली छेड काढण्याची घटना झडली होती. तर मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्याथीर्ंनी बेशुध्द अवस्थेत शाळेच्या मागे आढळून आली. सदरील विद्याथीर्ंना सहावीच्या वर्गात शिकत होती. मागील तीन दिवस बेपत्ता असल्यामुळे पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली तरी सुध्दा शाळा व्यवस्थापनकाडून दुर्लक्ष करण्यात आलं. या प्रकरणी संशयित म्हणून एका 25 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी महिला संघटनेच्या शिक्षकांवर आरोप केला आहे. तीन दिवसांपासून विद्याथीर्ंनी बेपत्ता होती याची माहिती असतांना ही शिक्षकांनी काय केलं ? आदिवासी विभाग काय करतोय ? शिक्षकांवर प्रशासनाचा वचकच राहिला नाही असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या मंगला गोसावी यांनी केला.

close