हज यात्रेसाठी पहिलं विमान मुंबईहून रवाना

November 17, 2008 7:00 AM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबर, मुंबईअजित मांढरेमुस्लीम धर्मात पवित्र मानल्या जाणार्‍या हज यात्रेला जाण्यास यात्रेकरूंची सुरूवात झाली आहे. 17 नोव्हेंबरला पहाटेच्या विमानाने हजयात्रेला यात्री रवाना झाले. देशातील हे या वर्षीच पहिलं विमान मुंबईहून रवाना झालं. आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जावं अशी प्रत्येक मुस्लिम धर्मियांची इच्छा असते. पण, काही भाग्यवान लोकच या यात्रेला जाऊ शकतात. मुंबईतून आज सकाळी पहाटे 2.30 च्या विमानाने 450 हज यात्री सौदी अरेबियाला रवाना झाले. यावर्षीच हे पहिलं विमान होतं. या वर्षी एकूण 37 विमानातून 1,57,000 हजयात्री यावर्षी यात्रेला जाणार आहेत. या वर्षी हजयात्रींचा कोटा 14 हजाराने वाढण्यात आलाय. यावेळी हज कमिटीचे चेअरमन अनिस अहमद यात्रींना निरोप देण्यासाठी विमानतळावर आले होते. हज यात्रेला जाणार्‍यां प्रवाशांनी देशाच्या खुशाली करता अल्लातालाला साकडं घालणार असल्याचं सांगितलं.आतापर्यंत सरकार तर्फे हज यात्रेला जाणार्‍यांना फक्त मुंबईहून जावं लागायचं पण, आता हजयात्रींसाठी नागपूर आणि औरंगाबाद विमानतळावरून जाण्याची सोय करण्यात आली आहे.

close