स्कॉटलंडच्‍या सुरक्षेचं आपण अनुकरण केलं पाहिजे – आर.आर.पाटील

September 25, 2011 12:50 PM0 commentsViews: 5

25 सप्टेंबर

इंग्लंडच्या दौर्‍यावर गेलेले राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आज मुंबईत परतले. स्कॉटलंडमधल्या सुरक्षेचं आपण अनुकरण केलं पाहिजे असं आर.आर. पाटील यांनी म्हटलं. स्कॉटलंडच्या सुरक्षेची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा होता. स्कॉटलंडमधल्या सीसीटीव्ही सुरक्षेची आर.आर.पाटील यांनी पाहणी केली.

स्कॉटलंड पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेत विविधता असल्याचं ते म्हणाले. आवश्यक वाटल्यास स्कॉटलंडचे एक पथक आपण मुंबईत बोलवू असंही त्यांनी सांगितलं. तसेच तिथं सीसीटीव्ही फूटेजचं ऍनॅलिलिस करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असते ते त्याचा पूर्ण अभ्यास करतात तशीच यंत्रणा आपल्याकडे उभारण्याची गरज असल्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गृहमंत्री आर.आर. पाटील लंडनच्या दौर्‍यावर रवाना झाले होते त्या दिवशी आपल्याला आबांना सुटाबुटात पाहायची इच्छा आहे. पण आपण त्यांना पाहू शकलो नाही अशी खंत व्यक्त केली होती. आणि आपल्या खास शैलीत आर आर पाटलांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण आज अजितदादांची इच्छा आबांनी पूर्ण केली. आर. आर. पाटील आज लंडनहून परतले ते थेट सुटाबुटातच त्यामुळे अखेर अजितदादांची इच्छापूर्ती झाली.

close