एनजीओ आणि कामगार संघटनांची कार्यशाळा संपन्न

September 25, 2011 2:30 PM0 commentsViews: 9

25 सप्टेंबर

मुंबईतल्या चेंबूर भागात राष्ट्रीय स्तरावरील सर्व एनजीओ (NGO) आणि कामगार संघटनांची दोन दिवसांची कार्यशाळा आज पार पडली. या कार्यशाळेला देशभरातील कामगारांवर काम करणार्‍या वेगवेगळ्या एनजीओ आणि कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने सफाई कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष वेधत सफाई कामगारंाना सेप्टी किट पुरवली जावीत. त्याचबरोबर काम करत असताना एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पाच लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. आणि सर्व कामगारांना मोफत औषधोपचार मिळाला पाहिजे असा निर्णय दोन दिवसापुर्वीच दिला आहे. त्याचीच जाणीव जागृती करण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

close