मोदींना ‘सद्भावना मिशन’च्या खर्चाचे हिशेब देण्याचे निर्देश

September 26, 2011 10:50 AM0 commentsViews: 5

26 सप्टेंबर

तीन दिवसांचं फाईव्ह स्टार उपोषण करणार्‍या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. तीन दिवसाच्या 'सद्भावना मिशन' च्या खर्चाचे तपशील सादर करण्याचे राज्यपालांचे निर्देश दिले आहेत. राज्यपाल कमला यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना हे निर्देश दिले आहेत. महा गुजरात जनता पक्षाचे अध्यक्ष गोवर्धन झडाफीया यांनी या सदर्भात राज्यपालांची भेट घेवून त्यांना निवेदन दिलं होतं. उपोषण करुन मोदींनी शासनाचा नियमांचा भंग केल्याची तक्रार केली होती. लोकायुक्तांच्या नियुक्तीवरुन मोदी आणि राज्यपालांमध्येच आधीपासूनच संघर्ष सुरू आहे.

close