शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे एकाच व्यासपीठावर

September 25, 2011 5:16 PM0 commentsViews: 4

25 सप्टेंबर

रा़ष्ट्रवादीचे सर्वेसर्वा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आज एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होतं माजी मंत्री अण्णा डांगे यांच्या अमृतमहोत्सवाचा.

आज इस्लामपूरमधल्या विद्यानगर हायस्कूल मैदानावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे एकाच व्यासपीठावर आले. ग्राम विकास मंत्री जयंत पाटील या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. धनगर समाजाला अनुसूचित जाती-जमातीसाठीच्या सवलती मिळाव्यात अशी मागणी अण्णा डांगेंनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. पण यासाठी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वेळ नाही, अशी खंत डांगेंनी व्यक्त केली.

close