सोन्या – चांदीच्या दरात घसरण

September 26, 2011 11:20 AM0 commentsViews: 4

26 सप्टेंबर

जगभरातल्या शेअरबाजारात घसरण सुरू असताना भारतीय शेअरबाजारातही घसरण सुरू आहे. पण एक दिलासादायक गोष्ट म्हणजे सोन्याच्या किंमतीतही घसरण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमंतीत गेल्या 28 वर्षात जेवढी घसरण झाली नाही, तेवढी घसरण आज एका दिवसात झाल्यामुळे दिल्लीत सराफा बाजारात सोन्यात 600 रुपयांनी घसरण होऊन 25, 740 रू प्रति दहा ग्रॅम, तर चांदी 500 रुपयांनी घसरून 53,500 रू प्रति किलो इतकी झाली आहे.

लंडनवरुन मिळालेल्या बातमीनुसार आंतरराष्ट्रीय सराफा कारभारात प्रचंड घसरण होत आहे. दरम्यान सोन्याचे भाव 1621.49 प्रति डॉलर सांगण्यात आले, परंतु नंतर ते 1284.40 डॉलर पर्यंत घसरण झाली. जाणकारांच्या मते बाजारात घसरण होत आहे. अमेरिकी बाजारात समतोल आणण्यासाठी सोन्याला डॉलर मध्ये बदलवत आहे. सध्या नफावसुलीचा काळ चालू आहे. सोन्या बरोबर इतर गोष्टींमध्ये सुध्दा घसरण दिसून येत आहे. चांदीच्या भावात जबरदस्त प्रमाणात घसरण होतेय. कारभाराच्या वेळी चांदीचे भाव 29.54 प्रति डॉलर इतकी नोंदविली गेली. मागील वर्षी नोव्हेंबर 2010 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.

close