एका राज्यात दोन सरकार चालू शकत नाही – नरेंद्र मोदी

September 25, 2011 3:11 PM0 commentsViews: 1

25 सप्टेंबर

तीन दिवसांचा सद्भावना मिशन पार पाडल्यानंतर नरेंद्र मोदींनी आता भ्रष्टाचारविरोधी रॅली काढली आहेत. अहमदाबादजवळच्या वस्त्रालपासून -गांधीनगरपर्यंत ही रॅली निघाली. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर गुजरात सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार्‍या उत्तर देण्यासाठी मोदींनी ही रॅली काढल्याचं सांगितलं जातंय. यावेळी मोदींनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. राजभवनात काँग्रेसचे वर्चस्व ही चिंतेची बाब आहे. केंद्राला राज्यपालांच्या आडून सरकार चालवायचंय. त्यासाठी राजभवनाचा वापर केला जातोय. पण एकाच राज्यात दोन सरकारं कशी चालतील असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. तसेच केंद्र सरकार राज्यपालांच्या मदतीने समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मोदींनी केला. केंद्राने विरोधीपक्षांचे राज्य अस्थिर करण्याचे उद्योग थांबवावेत अशी टीकाही त्यांनी केली.

close