कोल्हापूरमधील शेतकर्‍यांची साखरकारखान्यांकडून फसवणूक

November 17, 2008 7:09 AM0 commentsViews: 3

17 नोव्हेंबर, कोल्हापूरप्रताप नाईकपश्चिम महाराष्ट्रात सध्या उस दरावरून शेतकरी संघटनेनं आंदोलन छेडलं आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी उसाला बाराशे रुपये दर देण्याचं जाहीर केलं. पण प्रत्यक्षात जाहीर केलेला दर शेतकर्‍यांना मिळतच नसल्याचं स्पष्ट झालं आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे दुमालाचे शेतकरी वसंत पाटील यांनी गेल्या वर्षी यांनी आपल्या चार एकर शेतात उस लावला होता. त्यावेळीही उसाच्या दरावरून आंदोलन झालंआणि उसाला 1280 रुपयांचा भाव देण्याचं निश्चीत झालं. त्यामुळे त्यांनी आपला उस राजाराम साखर कारखान्याला दिला. पण प्रत्यक्षात टनामागे नउशे रुपयेच मिळाले. जवळपास सर्वच शेतकर्‍यांची अवस्था वसंत पाटील यांच्यासारखीच आहे. त्यामुळे यावेळी तरी साखर कारखान्यांनी जाहीर केलेला दर शेतकर्‍यांना मिळेल का , याबाबत शंकाच आहे. ' कारखानदारांनी मुळात जो दर जाहीर ते केलेलं आहे , तो जर दिला नाही तर कारवाई कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाहीत ' असं प्रादेशिक साखर महासंचालक पी. एल. खंडागळे यांनी सांगितलं. एकूणात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शेतकर्‍यांना वाली नसल्याचं चित्र या निमित्तानं पुढे आलं आहे.

close