शेतकर्‍यांच्या डेरा मोर्चावर सातार्‍यात जमावबंदी

September 25, 2011 4:53 PM0 commentsViews: 1

25 सप्टेंबर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड गावात जाऊन शेतकर्‍यांच्या प्रश्नावर डेरा घालण्यासाठी मोठ्या निर्धाराने हे शेतकरी निघाले. पण या आंदोलकांवर सातार जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लावली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन करणाच असा निर्धार विदर्भातील आमदार बच्चू कडू आणि अभ्यासक चंद्रंकात वानखडे यांनी व्यक्त केला. जमावबंदी लागू झाल्याचे कळताच औरंगाबाद येथे त्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. औरंगाबाद येथे पोचल्यानंतर त्यांना जमावबंदीचा आदेश लागू केल्याची माहिती कळाली आणि त्यानंतरही हे शेतकरी कराडकडे रवाना झाले आहेत.

close