नाशकात तरूणीवर सामुहिक बलात्कार ; 1 संशयित ताब्यात

September 26, 2011 12:14 PM0 commentsViews: 5

26 सप्टेंबर

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बलात्काराची आणखी एक तिसरी घटना आहे. औरंगाबाद येथील राहणार्‍या तरुणीवर नाशिकमध्ये बलात्कार झाल्याचं उघड झालंय. ओझर शिवारात हा प्रकार झाला. याप्रकरणी पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतलं आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार आणि आज पुन्हा एका विद्यार्थीनीवर झालेला सामुहिक बलात्कार त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.

काल शासकीय आश्रमशाळेतल्या सहाव्या वर्गात शिकणार्‍या 13 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली. पेठ तालुक्यातल्या इमामबारी आश्रमशाळेतली ही घटना आहे. शाळेच्या मागे बेशुद्धावस्थेत ही विद्याथीर्ंनी गावकर्‍यांना आढळली. ही विद्याथीर्ंनी तीन दिवसापासून बेपत्ता होती. या प्रकरणी संशयित म्हणून एका 25 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, आजया प्रकरणी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित तर वर्गशिक्षिकेला सेवामुक्त करण्यात आलं आहे. आदिवासी विकासमंत्री बबनराब पाचपुते यांनी ही घोषणा केली. दरम्यान आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पिडीत मुलीची भेट घेतली. पण यावेळी आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षेतेबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. 68 टक्के रेक्टरची पद रिक्त असल्याची कबुली त्यांनी दिली. उद्याच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करणार असल्याचही आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितलं.

close