‘टू जी’च्या आरोपींना जन्मठेप ?

September 26, 2011 9:20 AM0 commentsViews: 2

26 सप्टेंबर

2 जी प्रकरणी आता सीबीआयने आरोपींवर नव्याने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. सध्या या आरोपींविरुध्द दाखल असलेल्या गुन्हे सिध्द झाल्यास त्यांना जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा होवू शकते मात्र 409 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होवू शकते. कानिमोळी, ए राजा, शाहिद बलवा, विनोद गोयंका, युनीटेकचे चंद्राआणि शरत कुमार यांच्याविरुध्द नव्यानं गुन्हे दाखल झाले आहेत.

चिदंबरम यांना बोलवा !

दरम्यान, पी चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून जरी तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी सीबीआयच्या विशेष कोर्टात त्यांच्यासमोरच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्यात. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातला आरोपी ए राजा यांनी आज कोर्टात पुन्हा एकदा मागणी केली की पी चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्यात यावे. मी घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती पी चिदंबरम यांना होती. पण केवळ सुप्रीम कोर्ट आणि सीबीआयच्या चुकांमुळे मला तुरुंगात डांबण्यात आलं. आणि चिदंबरम यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

close