ललित मोदींना कोर्टाने फटकारले

September 26, 2011 12:29 PM0 commentsViews: 2

26 सप्टेंबर

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींना सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने नेमलेल्या समितीची पुनर्रचना करावी अशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली. एका वर्षापूर्वी मोदींना आयपीएलमधून हटवण्याबरोबरच त्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने ही समिती नेमली होती. पण मोदींनी या समितीचे सदस्य पूर्वग्रहदूषित आहेत असं म्हणत स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती. पण आता कोर्टाने ती फेटाळली.

close