आश्रमशाळेतील विद्यार्थीनीवर बलात्कारप्रकरणी 3 अधिकारी निलंबित

September 26, 2011 9:54 AM0 commentsViews: 5

26 सप्टेंबर

पेठ तालुक्यातल्या इमामबारी आश्रमशाळेत 13 वर्षाच्या विद्यार्थीनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आश्रम शाळेच्या 3 अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहेत. आदिवासी विकासमंत्री बबनराब पाचपुते यांनी ही घोषणा केली. दरम्यान आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पिडीत मुलीची भेट घेतली. पण यावेळी आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षेतेबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. 68 टक्के रेक्टरची पद रिक्त असल्याची कबुली त्यांनी दिली. उद्याच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करणार असल्याचही आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितलं.

दरम्यान, नाशिक आश्रमशाळेतील विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. हे कार्यकर्ते आदिवासी विकास भवनात शिरले आणि त्यांनी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

close