‘रामलीला’वर झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी राजबाला यांचा मृत्यू

September 26, 2011 12:47 PM0 commentsViews: 2

26 सप्टेंबर

रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांचं आंदोलन पोलिसांनी उधळून लावलं होतं. यावेळी झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्या राजबाला देवी यांचं निधन झालंय. जी.बी.पंत हॉस्पिटलमध्ये राजबाला यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजबाला या 53 वर्षांच्या होत्या. राजबाला यांचे दोन्ही हात आणि पाय लुळे पडले होते.

रामलीला मैदानात बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर मध्यरात्री पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत 53 वर्षांची राजबाला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांचे दोन्ही हात आणि पाय लुळे पडले होते. आणि त्यांना जन्मभर अपंगत्व येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. राजबाला यांच्याबरोबर आणखी 71 जण पोट आणि मानेवर बसलेल्या लाठ्यांमुळे जखमी झाले होते. मात्र तीन महिने मृत्यूशी झुंझ दिली मात्र आज काळाने त्यांच्यावर झडप घातली.

close