देव आनंद यांचा आज 88 वा वाढदिवस

September 26, 2011 12:58 PM0 commentsViews: 2

26 सप्टेंबर

चिरतरूण अभिनेते देव आनंद यांचा आज 88 वा वाढदिवस. या वयातही त्यांचा उत्साह वाखण्याजोगा आहे. आज मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला वाढदिवस धडाक्यात साजरा केला. यावेळी त्यांनी केक कापून पत्रकारांनी दिलेल्या अभिनंदनाचाही स्वीकार केला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये येऊन 66 वर्ष पूर्ण झाल्याचाही पुन:रच्चार केला. येत्या शुक्रवारी देव आनंद यांनी दिग्दर्शिक केलेला चार्जशीट हा सिनेमा रिलीज होतं आहे. हा सिनेमा म्हणजे सिनेरसिकांना आपण आपल्या वाढदिवसाची भेट दिली आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

close