जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात

November 17, 2008 7:22 AM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर, काश्मीरजम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदानाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातल्या दहा जागांसाठी 102 उमेदवार रिंगणात आहेत. गुरेझ, बंदिपोरा, सोनावरी, नोबरा, लेह, कारगील, झांस्कर, सुरनकोट, मंधर, आणि पुँछ-हवेली या दहा जागांचा समावेश आहे.खराब वातावरणामुळे काही भागातल्या मतदानावर परिणाम होतोय. सर्वच फुटीरवादी पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढलीय. हुरियत कॉन्फरन्सनं आज बंदिपोरामध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी हुरियत कॉन्फरन्सच्या सर्व नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. अमरनाथ वनजमिनीच्या मु्द्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीला लोकांचा किती प्रतिसाद आहे, या मतदानावरून समजेल.

close