गोवा खाण घोटाळ्याला सपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार – मनोहर पर्रिकर

September 26, 2011 1:31 PM0 commentsViews: 8

26 सप्टेंबर

गोव्यातील खाण घोटाळ्याबाबत विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येणार्‍या लोकलेखा समितीच्या अहवालात कोणावरही नावानिशी जबाबदारी निश्चित केली जाणार नसल्याचं धक्कादायक स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिली. खाण घोटाळ्यात केवळ मुख्यमंत्री कामतच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळचं जबाबदार असल्याचा आरोप पर्रिकर यांनी केला.