मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांची दिशाभूल केली – दत्ता इस्वलकर

September 26, 2011 3:27 PM0 commentsViews: 4

26 सप्टेंबर

गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिशाभूल केली असा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांनी केला. कामगारांच्या मोर्चानंतर दिलेलं एकही आश्वासन मुख्यमंत्र्यानी पूर्ण केलेलं नाही असं इस्वलकर यांनी म्हटलं आहे. याबाबत इस्वलकर यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांची भेट रविवारी भेट घेतली होती. आणि त्यांच्याकडे आपला मुद्दा मांडला. याबाबत मंगळवारी आणखी एक बैठक घेणार असल्याचे इस्वलकर यांना सांगितलं. सरकारने आश्वासन पाळलं नाही तर 2 ऑक्टोबंरनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा इस्वलकर यांनी दिला.

close