‘डेरा’ मोर्चाबाबत अद्याप निर्णय नाही !

September 26, 2011 5:09 PM0 commentsViews: 1

26 सप्टेंबर

विदर्भातील शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीवरुन निघालेला शेतकर्‍यांचा डेरा मोर्चा आज अहमदनगर जिल्हात येऊन धडकला. 23 सप्टेंबरला अमरावतीवरुन निघालेला हा मोर्चा मुख्यमंत्र्याच्या गावी डेरा टाकायला रवाना झाला आहे. आमदार बच्चू कडू, चंद्रकात वानखडे, विजय जावंधिया यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत. उद्या हा मोर्चा सातारा जिल्ह्यात पोहोचणार आहे. पण मोर्चा रोखण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लावली. मात्र जमावबंदी धूडकावून कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन करण्याचा असा निर्धार आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. दरम्यान काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि आमदार बच्चु कडू यांची बैठक पुण्यात झाली. विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडेही या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान एक महिन्याच्या आत बैठक घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं मान्य केल्याचं समजतंय. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली परंतु 'डेरा' मोर्चाबाबत अद्याप निर्णय नाही, सहका-यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी सांगितले.

close