लोकायुक्तांच्या अहवालाला सरकार दरबारी किंमत नाही – विजय टिपणीस

September 26, 2011 5:17 PM0 commentsViews: 5

26 सप्टेंबर

लोकायुक्तांच्या अहवालाला सरकार दरबारी किंमत नाही लोकायुक्तांच्या अहवालावर विधिमंडळात चर्चा होत नाही आणि त्यानुसार सरकार काहीही कारवाई करत नाही अशी परखड टीका राज्याचे माजी लोकायुक्त न्यायमूर्ती विजय टिपणीस यांनी केली. राज्यातील लोकायुक्त सक्षम करावेत अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर माजी लोकायुक्त विजय टिपणीस यांची आयबीएन लोकमतला खास मुलाखत दिली. लोकायुक्तांना फौजदारी गुन्हा नोंदवण्याचा अधिकार पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. लोकप्रतिनिधींविरूध्द गुन्हा नोंदवण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज असू नये. तसेच लोकायुक्तांना आर्थिक बाबींमध्येही अधिकार दिले पाहिजे असंही टिपणीस यांनी म्हटलं आहे.

close