महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

September 27, 2011 1:39 PM0 commentsViews: 3

27 सप्टेंबर

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळख असलेली कोल्हापूरची श्री महालक्ष्मी. या महालक्ष्मीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रोत्सव आता उद्यावर आला आहेत. मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. मंदिराच्या स्वच्छतेबरोबरच रंगरंगोटीचंही काम पूर्ण झालंय. मंदिराची पाचही शिखरं तसेच मंदिराच्या सभोवताली रोषणाई करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरही उजळून निघाला आहेत. दर्शनरांगेतही सुसज्ज मंडप घालण्यात आला आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षाही कडक ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तासोबतच मंदिराच्या चारही दरवाजांवर मेटल डिटेक्टर आणि मंदिर परीसारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

close