शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच !

September 27, 2011 11:29 AM0 commentsViews: 19

27 सप्टेंबर

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी हायकोर्टाने काही अटींवर शिवसेनेला परवानगी दिली आहे. यासाठी हायकोर्टाने काही अटी घातल्या आहेत. आवाजाची मर्यादा 55 डेसिबल्स ठेवण्यात यावी. तसेच मेळावा पूर्ण झाल्यावर 24 तासांच्या आत शिवाजी पार्क मैदान पूर्वत करून द्यावे या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे. या अटींचे काटेकोरपणे पालन करावे असंही हायकोर्टाने म्हटलं आहे.

दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा साजरा करत असते. मात्र यावर्षी शिवाजी मैदान सायलन्स झोन म्हणून घोषित केल्यामुळे शिवसेनेसमोर अडचण निर्माण झाली होती. मध्यंतरी हायकोर्टाने रामलीला समितीला शिवाजी पार्कचा वापर करण्याची परवानगी दिली होती. याच आधारावर आपल्यालाही परवानगी मिळावी अशी मागणी शिवसेनेनं हायकोर्टात केली होती. आज झालेल्या सुनावणीवर होकार देत काही अटी घातल्या आहे. आवाजाची मर्यादा 55 डेसिबल्स ठेवण्यात यावी. तसेच मेळावा पूर्ण झाल्यावर 24 तासांच्या आत शिवाजी पार्क मैदान पूर्वत करून द्यावे या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.

close