विरोधकांचा मध्यावधी निवडणुकांचा प्रयत्न – पंतप्रधान

September 27, 2011 3:54 PM0 commentsViews: 3

27 सप्टेंबर

पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेतून थोड्याच वेळापूर्वी दिल्लीत दाखल झाले आहेत. एअर इंडिया वन या आपल्या विमानात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला केला. विरोधक देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला. पण त्यांचा उद्देश यशस्वी होणार नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलंय. 2 जी घोटाळा प्रकरणात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच मंत्रिमंडळात कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अधिवेशनासाठी अमेरिकेला गेले होते. त्याचवेळी देशात 2 जी घोटाळा प्रकरण गाजत होता. आणि त्याप्रकरणी चिदंबरम यांना अटक करावी, अशी मागणी भाजपने लावून धरलीय. त्यावर पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी विमानातच केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.

पंतप्रधान म्हणतात…

'त्यांचा निवडणुकीत पराभव झालाय. विधानसभांच्या निवडणुकीतही काँग्रेसच यशस्वी ठरलीय. त्यामुळेच काही लोक देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत, असा मला संशय आहे. आमच्या सरकारमधले काही कमकुवत दुवे त्यांना सापडलेत. त्यामुळेच मध्यावधी निवडणुका लादू शकतो, असं त्यांना वाटत असावं. हे योग्य नाही. या सरकारला लोकांना पाच वर्षांसाठी निवडून दिलंय. त्यामुळे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.'

close