टू जी प्रश्नी जेपीसीच्या बैठकीत प्रचंड गोंधळ

September 27, 2011 9:40 AM0 commentsViews: 4

27 सप्टेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून आज जेपीसीच्या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. सरकारने जेपीसीला प्रणव मुखर्जी यांंचं पत्र उपलब्ध करुन दिलं नाही. अशी तक्रार करत भाजप आणि डाव्या पक्षांनी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळातच आजची ही बैठक ठप्प झाली. 2 जी बद्दलच्या चिदंबरम यांच्याविषयीच्या आपल्या पत्राविषयी आपण उद्या पंतप्रधानांशी बोलू असं अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कोलकत्यात सांगितलंय. पंतप्रधान आज संध्याकाळपर्यंत भारतात परत आहे. त्यानंतर उद्या त्यांच्याशी याविषयी चर्चा करू असं पंतप्रधान सांगितलं. तसेच 2 जी बद्दलच्या आतापर्यंतच्या सगळ्या घडामोडींबद्दलही प्रणव मुखर्जी मीडियाला माहिती देणार आहेत. मात्र पंतप्रधान भारतात येईपर्यंत याबद्दल आपण काहीही बोलणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय.

close