ट्रायच्या 100 मेसेजेस मर्यादेला युवासेनेचा विरोध

September 27, 2011 9:50 AM0 commentsViews: 6

27 सप्टेंबर

टेलिकॉम ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय च्या अनावश्यक कॉल्स आणि एसएमएस बंदीच्या निर्णयाच्या विरोधात आता युवासेनेने हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करणार आहे. आज ट्रायतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयात कोणत्याही मोबाईल सिमकार्ड धारकाला दिवसातून फक्त 100 एसएमएस पाठवण्याची मुभा आहे.

त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकाला जे नको असलेले एसएमएस, जाहिरातीचे एसएमएस येतात त्याला आळा बसेल अशी भुमिका या निर्णयामागे आहे असं ट्रायने स्पष्ट केलंय. हा निर्णय आजपासूनच लागू करण्यात येणार आहे. पण हा निर्णय म्हणजे ग्राहकांच्या आणि भारतीय नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे असं सांगत युवासेनेने त्याला विरोध केला.

अनेक महाविद्यालयीन तरूण, कर्मचारी वर्ग आणि व्यावसायिक एसएमएसद्वारेच अनेक कामं करत असतात त्यांना या निर्णयाचा फटका बसेल अशी भुमिका युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मांडली. या विरोधात येत्या दोन दिवसात युवासेना हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करणार आहेत.

close