एसबीआय वीस हजार नव्या नोकर्‍या देणार

November 17, 2008 8:04 AM0 commentsViews: 3

17 नोव्हेंबरअर्थव्यवस्थेवर मंदीचा प्रभाव जाणवतोय मात्र देशातल्या जॉब मार्केटमध्ये तरुणांना आशादायी असं चित्र दिसतंय. देशातली सर्वात मोठी सार्वजनिक बँक , स्टेट बँक ऑफ इंडियानं चालू आर्थिक वर्षात त्यांच्याकडे किमान वीस हजारजणांसाठी नोकर्‍या उपलब्ध असल्याची घोषणा केली आहे. या नव्या नियुक्त्यांखेरीज देशात अधिक शाखाही सुरू केल्या जातील अशी माहिती एसबीआयचे अध्यक्ष ओ.पी. भट्ट यांनी दिली आहे. एसबीआयनं सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसर्‍या तिमाहीत फक्त चाळीस टक्के नफा नोंदवलाय. तरीही काही दिवसांपूर्वी व्याजदर घटवण्यासाठी पहिलं पाऊल एसबीआयनंच उचललं होतं.

close