अखेर रहिवासी भागातील ट्रान्सपोर्ट कंपनी झाली ‘ट्रान्सफर’ !

September 27, 2011 11:02 AM0 commentsViews: 3

27 सप्टेंबर

पुण्यातल्या पर्वती परिसरात असलेल्या रहिवासी भागात बांधलेलं गोदाम आता हलवण्यास गोदामाचा मालक शांतीलाल रावळ याने सुरूवात केली आहे. रहिवासी भागात असलेल्या या गोदामातून दिवस-रात्र होणार्‍या अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे एल.आय.सी कॉलनी भागात राहणारे नागरिक त्रस्त होते. रावळ यांनी सोसायट्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीरपणे हे गोदाम बांधलंय असा नागरिकांचा आरोप होता. आयबीएन लोकमतने काल दिवसभर या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर रावळ यांनी हे गोदाम हलवायला आता सुरूवात केली.

close