कॅगचा घोळ ; टू जी 2,600 कोटींचा घोटाळा !

September 28, 2011 9:04 AM0 commentsViews: 6

28 सप्टेंबर

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी स्वत: कॅगच आता वादाच्या भोवर्‍यात अडकलंय. कॅगचे विनोद राय यांनी स्वत:च्याच ऑडिटरने घोटाळ्याचादिलेला आकडा बदलल्याची कागदपत्रं आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहेत. 2जी स्पेक्ट्रमच्या विक्रीत झालेल्या नुकसानीचा आकडा कॅगनेफुगवून दाखवल्याचा या कागदपत्रांवरुन सिद्ध होतंय. कॅगच्या ऑडिटरनं दाखवलेलं 2,600 कोटींचं नुकसान कॅगनं एक लाख 76 हजारांपर्यंत वाढवून दाखवल्याचं उघड झालंय. यासंदर्भात संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीने कॅगच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना बोलावल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

close