सुधींद्र कुलकर्णी तुरूंगात

September 27, 2011 11:45 AM0 commentsViews: 12

27 सप्टेंबर

कॅश फॉर व्होट प्रकरणी लालकृष्ण अडवाणींचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांना आज अटक झाली. आणि त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर आता 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्याआधी दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला.

कॅश फॉर व्होट प्रकरणाची माहिती ज्यांनी जगासमोर आणली, त्यांना संरक्षण द्यायचं सोडून अटक केली जातेय हे दुदैर्वी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने दिली. दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात शिरण्यापूर्वी सुधींद्र कुलकणीर्ंनी कॅश फॉर व्होट प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा केला. स्टिंग ऑपरेशनची माहिती भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला होती असं सुधींद्र कोर्टात म्हणाले. दरम्यान, कॅश फॉर व्होट प्रकरणातील मुख्य आरोपी अमर सिंग यांनी परदेशात औषधोपचारासाठी जाण्याचा अर्ज केला.

दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात शिरण्यापूर्वी सुधींद्र कुलकणीर्ंनी कॅश फॉर व्होट प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा केला. लालकृष्ण अडवाणींच्या या माजी सहका-यांनी अटकपूर्व जामीन मागितला होता. कारण आधीच भाजपचे दोन माजी खासदार कुलस्ते आणि भगोडा गजाआड गेले आहेत. 2008सालच्या विश्वासदर्शक ठरावा दरम्यान याच खासदारांनी नोटांची बंडलं दाखवली होती.

सुधींद्र कुलकर्णी तुरुंगातन्यायाधीश: कुलकर्णी यांनी त्यावेळी अधिका-यांशी संपर्क का नाही साधला ? त्यांनी मौन का बाळगलं ?कुलकर्णी यांचे वकील:

ज्यावेळी एक कोटी रुपये मिळाले, तेव्हा आमचा हेतू साध्य झाला होता. पण सीएनएन -आयबीएन टीमला तपासासाठी आणखी वेळ हवा होता. कुलकर्णी यांनी काहीही बेकायदेशीर केलं नाही. त्यांनी अधिका-यांशी संपर्क साधला नाही, कारण त्यांना लोकसभेत पर्दाफाश करायचा होता. त्यांना भ्रष्टाचार लोकांसमोर आणायचा होता. जर त्यांना मिळालेला पैसा स्वतःजवळ ठेवायचा असता, तर त्यांनी सीएनएन -आयबीएन टीमला चित्रीकरणासाठी बोलावलंच नसतं.

पण हे म्हणणं न्यायाधीशांना पटलं नाही आणि जामीन अर्ज फेटाळून सहआरोपी सुधींद्र कुलकणीर्ंना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. सुधींद्र कोर्टात म्हणाले की कॅश फॉर व्होटच्या स्टिंग ऑपरेशनची माहिती भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अडवणींनीही हे मान्य करत स्वतःला अटक करवून घेण्याची तयारी दाखवली होती. पण या प्रकरणाचे लाभार्थी यूपीएतले नेते आहेत, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजपने पुन्हा केली.

दरम्यान, कॅश फॉर व्होट प्रकरणातील मुख्य आरोपी अमर सिंग यांनी परदेशात औषधोपचारासाठी जाण्याचा अर्ज केला. त्यावर कोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे.

close